HW News Marathi
महाराष्ट्र

आजचे लाईव्ह सुद्धा नुसत्या गप्पा, ना दिशा ना मदत, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | कोरोना, लॉकडाउन, आरे मेट्रो कारशेड आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. जनतेशी साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर भाजपानं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या संवादावर टीका करताना “आजचे लाईव्ह म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करणारे आहे,” असा आरोप भाजपानं केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी संबोधित केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काही प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “लोकल कधी सुरू करणार, गरीबांना काही मदत देणार का? या व अशा अनेक प्रश्नांना उत्तरे नाहीत. कसली माहिती नाही. एकूण काय पूर्वीच्या फेबुलाईव्ह प्रमाणेच आजचे लाईव्ह सुद्धा नुसत्या गप्पा, ना दिशा ना मदत. करोनाच्या लढाईत जनतेचा प्रतिसाद अल्प मिळाला, असं सांगत आपली जबाबदारी टाळणारे आजचे लाईव्ह म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करणारे आहे. करोनाविरोधातील लढाई जनता लढते आहे. अशावेळी त्यांना कोणतीही मदत न देता त्यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करण्याने राज्य सरकारचे अपयश लपणार नाही,” अशी टीका उपाध्ये यांनी केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा, मी देशासाठी शहीद झालो !

News Desk

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा बुडून मृत्यू

News Desk

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सत्यजित तांबेनी केला निषेध

News Desk