HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (११ ऑक्टोबर) जनतेशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी १.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते राज्यातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी लॉकडाऊन पूर्णपणे शिथील न केल्यामुळे दैनंदिन व्यवहारांना हवा तसा वेग आला नाही. तसेच लोकल ट्रेन सुरु करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

तर, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी मराठा संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा संघटनांच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे मराठा आंदोलकांचे समाधान झाले असले तरी समाजाच्या इतर स्तरांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सगळ्यावर काही निर्णायक भाष्य करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझे वीजबिल मलाच झटका”, वीजबिल वसुलीच्या आदेशावरुन भाजपची आक्रमक भूमिका

News Desk

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Aprna

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk