HW News Marathi
राजकारण

भाजपामध्ये येणा-यांची रांग मोठी | मुख्यमंत्री

मुंबई | कोकण पदवीधर मतदार संघातून बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या आमदारची राजीनामा दिला. अवघ्या काही वेळातच गुरुवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डावखरेंनी भाजपात प्रवेश केला यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, भाजपमध्ये विविध पक्षातून येणा-या लोकांची संख्या मोठी आहे त्यामुळे पक्षात कोण येणार हे सर्वांना वेळोवेळी कळेल असेही ते म्हणाले.

निरंजन डावखरे यांच्या नंतर आमदार नरेंद्र पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत विविध पक्षांतील लोकांची मोठी रांग लागली आहे. योग्य त्या लोकांना भाजपमध्ये नेहमी संधी देण्यात येते. चांगले काम करणा-या लोकांचे भाजपमध्ये स्वागतच आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या वैचारिक विचारसरणीचे! – प्रकाश आंबेडकर

Aprna

काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका

News Desk

गोपीचंद पडळकर यांची वंचितला सोडचिठ्ठी, आता भाजपध्ये जाणार ?

News Desk