HW News Marathi
Covid-19

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

मुंबई : गँगस्टर अरुण गवळी यांची कन्या उद्या ( ८ मे) लग्नगाठ बांधणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. १५ ते २० नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. कोरोनाच्या परिस्थितीत हे लग्न पार पडणार आहे.

https://www.instagram.com/p/B6ufldlhUNv/?utm_source=ig_web_copy_link

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी घोषणा ! पुण्यात दिवसभर जमावबंदी, तर संध्या ६ ते सकाळी ६ संचारबंदी

News Desk

…नाहीतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारकपातीला सामोरे जा

News Desk

जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर

News Desk