विशाखापट्टणम | आज (७ मे) विषाखापट्टणम पॉलिमर कंपनीत विषारी गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह २ जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ३०० जणांना या गॅस गळतीने बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी तिरुमाला राव यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या विषारी वायूच्या गळतीमुळे जवळपासच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Nine people have died due to #VizagGasLeak & 300 others are admitted at various hospitals: Visakhapatnam District Medical & Health Officer Tirumala Rao #AndhraPradesh pic.twitter.com/XqO1ixUAv6
— ANI (@ANI) May 7, 2020
ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Andhra Pradesh: Visakhapatnam District Collector Vinay Chand visited King George Hospital where people affected by #VizagGasLeak are being treated. pic.twitter.com/tEZLriS82b
— ANI (@ANI) May 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.