HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराजांबद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला?

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील काल प्रकाश आंबेडकर यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दात ट्विट करून टीका केली होती. मात्र ते ट्विट त्यांनी डिलीट केले असून त्यामागील कारण देखील सांगितलं आहे. “प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं. घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं.” असं ट्विट आज केलं आहे, असे नवे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

swarit

भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध ‘त्या’ प्रकरणी वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

News Desk

शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफ लाइन’ होणार?हा निर्णय भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय असेल – पंकजा मुंडे

News Desk