HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘तिरडी आंदोलन’ पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा निषेध

मुंबई | कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. मंगळवारी सुमारे ८५ रुपये पैसे पेट्रोलचा तर ७३ रुपये डिझेलचा दर झाला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा ७२ रुपये प्रतिलीटर वाढ झाली असून देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. तर दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७६ रुपयांवर पोहोचले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींने नवीन उच्चांक गाठला आहे.तसेच प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढीमुळे आता या प्रश्नावर चांगलेच राजकारण पेटताना दिसत आहे. आज याचा प्रात्यय देखील आला. आता मुद्द्यावर किती राजकारण होईल. हे येणारा काळच सांगू शकेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार ? 

News Desk

“अजूनही वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,” उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना भावनिक आवाहन

Aprna

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna