HW News Marathi
Covid-19

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, एकूण संख्या २ हजार ५७४ वर

पुणे | विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ५७४ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ७६४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज (६ मे) दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील २ हजार २८७ बाधित रुग्ण असून ६०८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १ हजार ५५५ आहे. कोरोनाबाधित एकूण १२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८६ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात ९२ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात १४५ बाधित रुग्ण असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात ३५ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण २६ हजार ३२६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी २५ हजार ४ चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ३२२ नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २२ हजार १०६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून २ हजार ५७४ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील ७८ लाख ९४ हजार ८३० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ३ कोटी १२ लाख ९६ हजार ४६५ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी एका व्यक्तीला अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

Aprna

२३ दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू | मुख्यमंत्री

News Desk

बकरी ईद साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

News Desk