HW News Marathi
मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

मुंबई | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा ७२ रुपये प्रतिलीटर वाढ झाली असून देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. तर दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७६ रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या सात दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींने नवीन उच्चांक गाठला आहे. मागील चार आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढत आहेत. तसेच प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावण्यात येत आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली. त्यानंगर ७ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत पेट्रोल सर्वात महाग :

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोल सर्वात महाग म्हणजेच ८४.०७ रुपये लिटर आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल गोव्यात आहे. तिथे पेट्रोलची किंमत ७०.२६ रुपये लिटर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

News Desk

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन

News Desk

रुसलेला पाऊस आजपासून परतणार

News Desk