HW News Marathi
महाराष्ट्र

“महावेध” प्रकल्पाकडे महाराष्ट्र कृषी विभागाचे दुर्लक्ष

सोलापुर | शेतक-यांना अनेकदा हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. दुष्काळ, गारपीट यांमुळे होणारे पीकाचे नुकसान, दुबार पेरणीत होणारा खर्च अशा अनेक संकटाचा सामना शेतक-यांना नेहमीच करावा लागतो. हवामानाचा अचूक अंदाज न आल्यामुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून कृषी विभाग महाराष्ट्र व स्कायमेट वेदर सर्विस यांच्या संयुक्त भागिदारीतुन स्वंयचलित हवामान केंद्रे महाराष्ट्रातील सर्व महसुल मडंळात “महावेध” प्रकल्प म्हणून २०१६ मध्ये उभारली गेली होती.

“महावेध” प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व महसुल मंडळात २ हजार ६५ स्वंयचलीत हवामान केंद्रे उभारण्यात आली. या प्रकल्पासाठी प्रत्येक महसुल विभागातर्फे जागा उपल्ब्ध करून दिली गेली होती. “महावेध” प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या माहितीचा उपयोग पिक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन कृषी संशोधन व आप्पत्ती व्यवस्थापनासाठी होणार होता.

या प्रकल्पातंर्गत शेतकऱ्यांना १२ किलोमीटर परीसरातील अचूक हवामानाची नोंद दर १० मिनीटांनी उपल्बध होणार होती. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्य ,तापमान ,हवेची सापेक्ष आद्रता ,वा-याचा वेग , दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप केले जाते. जमा झालेली माहिती पीकविमा योजना, पीकविषयक सल्ला, हवामान विषयक संशोधन यासाठी ठरणार होती. पण आनेक ठिकाणी हवामानाचा वेध घेणारे महावेध प्रकल्प धूळखात पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाच्या अचूक अंदाजापासून वंचित राहत आहेत. प्रचंड गाजावाजा करुन सुरु झालेली योजना इतर सरकारी योजनाप्रमाणेच अपयशी ठरल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

राज्यात कुठे कुठे आहेत हवामान केंद्रे

  • राज्यातील सर्व महसुल मंडळात हवामान केंद्रे आहेत
  1. यवतमाळ -१०१
  2. पुणे – १००
  3. सोलापूर – ९१
  4. नाशिक – ९२
  5. बुलडाणा – ९०
  6. सातारा – ९१
  7. आहमदनगर – ९७
  8. गडचिरोली – ४०
  9. चंद्रपुर – ५०
  10. गोदिंया – २५
  11. वर्धा – ४७
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा मंत्रिमंडळाची पुनरर्चना, ‘त्या’ ४ आमदारांना मंत्रिपदाची शपथ

News Desk

हिंदी भाषेतून पासपोर्टसाठी अर्ज करणे शक्य, इंग्रजी अवगत नसऱ्यांनाही दिलासा

News Desk

“राणेंना संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील”

Ruchita Chowdhary