HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ५ जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय  

मुंबई | कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेता बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येताना दिसत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

राज्य सरकारने ३० सप्टेंबर रोजी मिशिन बिगिनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना राज्यातील रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अखेर पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार असून, दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हॅलो, अजित पवार बोलतोय…”, आमदार निलेश लंकेंना अजित पवारांनी फोन करत दिला मोलाचा सल्ला

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने परळीत मुंडे बहीण-भावात मोर्चे बंधणीला सुरुवात

Aprna

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात तब्बल आठ वर्षानंतर दोषारोप निश्चित!

News Desk