HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या १४ हजार ५४१ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात काल (४ मे) ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या

  • मुंबई : ९३१० (३६१)
  • ठाणे: ६४ (२)
  • ठाणे मनपा: ५१४ (८)
  • नवी मुंबई मनपा: २५४ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
  • उल्हासनगर मनपा: ४
  • भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
  • पालघर: ४६ (१)
  • वसई विरार मनपा: १५८ (४)
  • रायगड: ४१ (१)
  • पनवेल मनपा: ६४ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)
  • नाशिक: २१
  • नाशिक मनपा: ३१
  • मालेगाव मनपा: ३३० (१२)
  • अहमदनगर: ३५ (२)
  • अहमदनगर मनपा: ०७
  • धुळे: ८ (२)
  • धुळे मनपा: २४ (१)
  • जळगाव: ४६ (११)
  • जळगाव मनपा: ११ (१)
  • नंदूरबार: १८ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)
  • पुणे: १०२ (४)
  • पुणे मनपा: १७९६ (१०६)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)
  • सोलापूर: ३ (१)
  • सोलापूर मनपा: १२६ (६)
  • सातारा: ७९ (२)
  • पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)
  • कोल्हापूर: ८
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
  • सिंधुदुर्ग: २ (१)
  • रत्नागिरी: १० (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)
  • औरंगाबाद:३
  • औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
  • जालना: ८
  • हिंगोली: ५२
  • परभणी: १ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)
  • लातूर: १९ (१)
  • लातूर मनपा: ०
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ३
  • नांदेड मनपा: २८ (२)
  • लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
  • अकोला: ७ (१)
  • अकोला मनपा: ४८ (५)
  • अमरावती: १ (१)
  • अमरावती मनपा: ५७ (९)
  • यवतमाळ: ९१
  • बुलढाणा: २४ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: १७२ (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ३
  • नागपूर मंडळ एकूण: १८० (२)
  • इतर राज्ये: २९ (५)

एकूण: १४ हजार ५४१ (५८३)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

News Desk

“कोरोनाचा म्हणूनच प्रादुर्भाव वाढला”, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल!

News Desk

कोरोनामुळे देशात १२ ऑगस्टपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार | रेल्वे बोर्ड

News Desk