HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

मुंबई | भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे त्यांच्याच पक्षावर म्हणजेच भाजपवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असेही म्हटले जात आहे. आझ खडसे शरद पवारांची भेट मुंबईत घेणार होते. यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ खडसेंबाबत अशी कोणतीही भेट नियोजित नाही, त्यांच्या भेटीबद्दल विनंतीही करण्यात आली नाही, उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आज भेट नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र एकनाथ खडसे आज मुंबईत आहेत, वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आल्याचं खडसेंनी सांगितलं, त्याचसोबत मी लपून छपून कोणाची भेट घेणार नाही, वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला होता.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यकारिणीत खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता. तसेच, गेल्या आठवड्यात शरद पवार आणि पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत एक बैठक केली होती. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जात होत. त्यानंतर आता खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता पण आता…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

“लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला” – संजय राऊत

News Desk

नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, ५२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

News Desk