HW News Marathi
मुंबई

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

मुंबई | कोल्हापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार आणि शाहू दयानंद हायस्कूलचे कलाशिक्षक संजय कुंभार यांच्या जलरंग या व चारकोल मधील नवनिर्मित निसर्गचित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटर येथील कलादालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ मे २१ मे दरम्यान भरविण्यात आले असून रसिकांसाठी विनामुल्य आहे. कलाप्रेमींसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले रहाणार आहे. प्रस्तुत प्रदर्शनात कलाकाराने मांडलेली विलोभनीय निसर्गचित्रे व इतर भावपुर्ण अविष्कार हे मनोवेधक व कलात्मक आहेत.

चित्रकार संजय कुंभार यांना बालपणापासूनच ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग यांचे विषेश आकर्षण आहे. सुक्ष्म निरीक्षण व आकलन शक्ती तसेच त्याची भव्यता हि कुंभार यांच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने पहायला मिळते विविधांगी व रम्य अशा त्यांच्या चित्रांना प्रदर्शनात नेहमीच कलाप्रेमींचा आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली चित्रे केवळ रम्यच नाहीत तर विलोभनीय आहेत. त्यांनी वास्तववादी शैलीतून मांडलेली निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे. तसेच ऐतिहासिक स्थळांवरील वास्तू आणि त्यांची संस्कृतीमुल्ये व परंपरा भावपूर्ण सादरीकरणातून व्यक्त होणा-या नेमक्या मनोभावना आणि मानवी मनात आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्राण्याबद्दल आणि निसर्गाप्रती असणारा दृढ स्नेहभाव संजय कुंभार यांनी आपल्या आर्षक व मनोरम शैलीत व्यक्त केला आहे.

कुंभार यांच्या स्थिर चित्रातून दर्शविणा-या विविध वस्तूंचे व त्यातील नात्यांचे दर्शन केवळ अवर्णनीयच. चारकोलमधील व्यक्तीचित्रे व त्यांच्या चेह-यावरील भाव पहाणा-याच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाहीत. मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते व ते स्नेहबंध आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व कलात्मक शैलीत त्यांनी आपल्या बोलक्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवई तलावातील जलक्रीडा सुविधेला मगरींचा अडथळा

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

News Desk

धोबीतलावं मध्ये आता गल्लोगल्ली फिरणार घंटागाडी

News Desk