HW News Marathi
राजकारण

भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर भाजपसाठी दक्षिण दिग्विजयाचे द्वार खुले होईल अशी चर्चा कर्नाटक निकालापुर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु निवडणुकीच्या निकालात चढ उतार झाले तरीही कर्नाटकात अखेर भाजपने गुरुवारी आपली सत्ता प्रस्थापित केली. येडियुरप्पा यांच्या शपथ विधीनंतर ते भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

येडियुरप्पांची थोडक्यात ओळख –

  • बूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा (बी एस येडियुरप्पा)
  • जन्म १९४३ कारपेट तालुक्यातील बुकानाकेरे गाव
  • भात मीलमध्ये क्लार्क
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव
  • १९७२ ला जनसंघाचे तालुका अध्यक्ष
  • १९७५ ला आणीबाणीत ४५ दिवसांचा कारावास
  • १९८३ मध्ये पहिल्यांदा आमदार
  • शिकारीपुरा मतदारसंघातून आठ वेळा आमदार
  • १९८८ मध्ये कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष
  • १९९४ मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते
  • १९९९ साली निवडणूक हरले, विधानपरिषदेतून आमदार
  • २००८ मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजप सरकार
  • २०१२ मध्ये कर्नाटक जनता पक्षाची स्थापना
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपमध्ये पक्ष सामील
  • २०१४ साली शिमोगा लोकसभा मतदारसंघातून खासदार
  • २०१६ मध्ये पुन्हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk

कमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

News Desk

काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे पद रद्द

News Desk