HW News Marathi
महाराष्ट्र

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील केंद्र सरकारने बंदी उठवावी, मुर्तीकारांची राज ठाकरेंकडे मागणी 

मुंबई | कोणतीही अडचण असो मनसे अध्यक्ष राज ठाकरे ती सोडवणारच. या विशअवासाने अनेकजण त्यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन जातात.पेणमधील मूर्तीकार आपल्या विविध मागण्यांचं निवदेन घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर ही भेट झाली. पेण हे मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते. केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणे मूर्तिकारांना कठीण झालेआहे. याट पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तीकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत.मूर्ती घडवण्यासाठी POP मिळत नाही. त्यामुळे POP वरील बंदी उठवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. मी सरकार दरबारी हा विषय मांडेन, अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी राज ठाकरेंकडे आपल्या व्यथा मांडल्या.डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्या केल्या होत्या. काही मागण्या पुर्णही झाल्या त्यामूळे बाकी सर्व मागण्याही पुर्ण होतील अशा अपेक्षेने राज ठाकरेंकडे मदतीचा हात अनेक जण मागत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk

‘स्वाभिमानी’तील वाद मिटला, राजू शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी दूर

News Desk