HW News Marathi
महाराष्ट्र

दाढी करण्यासाठी तीन लाखाचा वस्तारा, व्यवसाय वाढविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

सांगली | सांगलीतील गावभाग परिसरातील उस्त्रा मेन्स स्टुडिओ हे रामचंद्र काशीद यांचे सलून आहे. काहीतरी वेगळे आणि भव्यदिव्य करण्याची इच्छा असलेल्या काशीद यांनी ३ लाख रूपये खर्चून साडे दहा तोळ्यांचा वस्तारा तयार करून घेतला आहे. रामचंद्र यांचे वडील दत्तात्रय यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांचीच या सोन्याच्या वस्ता-याने दाढी करून त्यांनी याची सुरूवात केली आहे.हा आगळावेगळा वस्तारा तयार करण्यासाठी सांगलीतील कुणीच सुवर्ण कारागीर तयार झाला नाही. अखेर सांगलीच्या चंदूकाका सराफ पेढीने हे आव्हान स्विकारून अवघ्या वीस दिवसात वस्तारा तयार केला.

व्यवसायात प्रगती करण्यासाठी नाव मिळविण्यासाठी प्रसिद्धीचा आलेख सर करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. आपला व्यवसाय अधिक चांगला कसा होईल, ग्राहक कसे आकर्षित होतील यासाठी अनेक व्यवसायिक आगळीवेगळी शक्कल लढवतात अशीच अफलातून शक्कल रामचंद्र काशीद या सलून व्यवसायिकाने लढवली आहे. रामचंद्र यांनी दाढी करण्यासाठी चक्क सोन्याचा वस्तरा बनवला आहे.

सांगलीच्या गावभाग येथे रामचंद यांचे ‘उस्त्रा फॉर मेन्स’ हे सलूनचे दुकान आहे. त्यांनी आपल्या दुकानात दाढी करण्यासाठी तब्ब्ल दहा तोळे, १८ कॅरटचा सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. यासाठी त्यांनी साडे तीन लाख रूपये खर्च केला आहे. सोन्याचा वस्तरा बनवणे तशी सोपी गोष्ट नव्हती, कारण अनेक सराफ व्यावसायिकांनी सुरूवातीला रामचंद यांना नकार दिला होता. मात्र, सांगलीतील चंदू काका सराफ यांच्यामार्फत पुण्यातून एका कुशल कारीगाराकडून अगदी हुबेहूब सोन्याचा वस्तरा तयार करून घेतला.

आपल्या आई- वडिलांच्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसा दिनी रामचंद्र यांनी या सोनेरी वस्तऱ्याचा शुभारंभ केला. त्यामुळे रामचंद्र यांच्या दुकानात अनेकजण हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या सोन्याचा वस्तऱ्याने दाढी करायचे दर तसे खिश्याला परवडणारे नाहीत. पण एकदा तरी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्याची हौस भागवणारे नक्कीच माझ्याकडे येतील अशी अपेक्षा रामचंद काशीद यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या सोन्याच्या वस्ताऱ्याची चर्चा मात्र सांगली शहरात जोरदार रंगली आहे. सोन्याच्या वस्ता-याने दाढी करून घेण्यासाठी सांगलीकरांमध्ये नवी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. गावभाग येथील रामचंद्र दत्तात्रय काशीद असे सलून व्यवसायिकाचे नाव असून या वस्ता-याने दाढी करून घेण्यासाठी सध्या गर्दी होताना पहायला मिळत आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता कुणाला काय CD लावायची, ती लावावी”, भाजपचे खडसेंना थेट आव्हान

Ruchita Chowdhary

“मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, विमानतळावर केलेला गरबा बरंच काही सांगतं”; सचिन सावंत

News Desk

मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू

News Desk