HW News Marathi
राजकारण

कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे अख्या देशाचे लक्ष लागले होते. भाजप, कॉंग्रेस,जेडीएस यांसह कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी प्रत्येक पक्षाची चढाओढ सुरु झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भात सर्व निर्णय राज्यांपालांवर सोपविण्यात आले होते.

राज्यपाल काय निर्णय घेणार यावर अनेक महत्वाचे निर्णय अवलंबून होते. परंतु राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यामुळे या निमंत्रणावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने दाखल केली. रात्री उशीरा कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मध्यरात्री युक्तीवाद आणि प्रतिवादाला सुरुवात झाली. पंरतु अद्याप या याचिकेवर निर्णय झालेला नाही या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

शेवटपर्यंत झालेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर पहाटेच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर भाजप नेते येडियुरप्पा यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले. हा शपथविधी सोहळा ९ वाजता राजभवन येथील ग्लास हाऊस येथे पार पडला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे”, छगन भुजबळांचा टोला

Aprna

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk

मी राजकारण सोडून देईन !

News Desk