मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण करूनच राहतात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी करत मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली होती. त्यांची समस्या राज ठाकरे यांनी दूर केली आहे.
२४ तासांच्या आत त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला व कोळी भगिनींची समस्या सोडवली अशी माहिती मनसे अधिकृत या टि्वटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
कोळी महिला थेट कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी केली. राज ठाकरेंनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. फक्त कोळी भगिनीच नव्हे, तर लॉकडाउनच्या काळात जीम चालक-मालक, सलून व्यावसायिक, मुंबईतील डब्बेवाले यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या.
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.