HW News Marathi
Covid-19

औरंगाबादमध्ये १७ मेपर्यंत दारुची दुकाने बंद राहणार

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रभाव असलेल्या कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागात दारूची दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली आहे. यामुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आजपासून (४ मे) दारूची दुकाने सुरू करण्यात आली असून देशासह राज्यातील अनेक ठिकाणी मद्यप्रेमींनी दुकाना बाहेर लांब रांगा लावल्या आहेत. मात्र, राज्यातील औरंगाबादमध्ये लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे १७ मेपर्यंत दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशास आस्तिक कुमार पांडे यांनी काल (३ मे) रात्री यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

औरंगाबाद रेड झोनमध्ये आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्या २९१ वर पोहोचली आहे. त्यामुळे दारुच्या परवानगीला तूर्तास परवानगी दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी उदय चौहान काल दुपारी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दारूची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतरही मद्यप्रेमींना दुकाना बाहेर बॅरिकेट्स लावणे यासारख्या वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

News Desk

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये उद्या आयोजित सर्व सभा रद्द

News Desk