मुंबई | कोरोनाच्या या संकटकाळात अनेकांना काही अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे एक विनंती केली आहे. कोरोनाचे रुग्ण जेव्हा रुग्णालयात जातात तेव्हा आमच्याकडे बेड नाहीत असे सांगितले जाते. त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत रुग्णालयांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
या आजाराचा प्रादूर्भाव सर्वसामान्य व्यक्तींना झाला, तर त्यांनी काय करावे यावर काम करण्याची गरज आहे. तुम्ही यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे, याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरिही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावे, कोठे जावे हे कळत नाही.
यासंदर्भात आमच्याकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.