मुंबई | “लोक हसतात म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना. या नेत्यांना मला सांगायचेय, लोकांच्या हसण्यावर रागावण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवा आणि राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा,” असा टोला राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांना लगावला आहे. रोहित पवारांसोबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील विधकांची ट्वीट करत फिरकी घेतली.
लोक हसतात 😂😂म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना.
या नेत्यांना मला सांगायचंय, लोकांच्या 😂 हसण्यावर रागावण्यापेक्षा 😠हास्यास्पद वर्तन थांबवा & राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा.#WorldLaughterDay
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 3, 2020
रोहित पवार यांनी जागतिक हास्य दिन ट्वीट करत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हणतात, “लोक हसतात म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना. या नेत्यांना मला सांगायचेय, लोकांच्या हसण्यावर रागावण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवा & राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा. याट्वीटमध्ये त्यांनी इमोजीचा देखील वापर केला आहे. आणि शेवटी हॅशटॅग जगतिक हास्यदिन लिहिले आहे.
आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा. 😀😁#WorldLaughterDay
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 3, 2020
जयंत पाटील म्हणाले, “गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टिका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.”दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा,” शेवटी हॅशटॅग जगतिक हास्यदिन लिहिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.