बंगळुरू | कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणूकीकडे पाहिले जात आहे. शनिवारी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत फक्त ५६ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
56% voter turnout recorded till 3 pm in #KarnatakaElections2018 pic.twitter.com/BRdbTqEG0u
— ANI (@ANI) May 12, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या २२२ जागांसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा आणि सदानंद गौडांनी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले होते तर दुपारपर्यंत हा आकाडा ५६ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.