HW News Marathi
महाराष्ट्र

एवढेही येऊ नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतून भाजप-शिवसेनेत होणारे इनकमिंग थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपमध्ये सुरु असलेल्या या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर जितकी अस्वस्थता अन्य पक्षांमध्ये आहे तशीच काहीशी अस्वस्थता भाजपच्या नेत्यांमध्ये देखील दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. “सध्या भाजपमध्ये मेगाभरती चालू आहे. नुकतेच दुसऱ्या पक्षातले ४ आमदार भेटून गेले आहेत. मी त्यांना म्हणालो कि थोडं थांबा आणि प्रतीक्षा करा. एवढेही येऊ नका की आम्हालाच पक्षातून बाहेर पडावे लागेल”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे !

भाजपच्या या इन्कमिंगवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या शाद्बिक वादात दानवे यांनी देखील उडी घेतली होती. “भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात ? त्यांच्याकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे”, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केली होते. त्यावर “आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या वादात उडी घेत दानवे म्हणाले होते कि, “आमच्याकडे वॉशिंग पावडर, डॅशिंग रसायन तर सोडाच पण आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. त्यानेच धुवून आम्ही नेत्यांना पक्षात घेत असतो”, असे दानवेच म्हणाले होते.

सध्या मुख्यमंत्री आपलेच आहेत !

मुख्यमंत्रीपदाबाबत देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी भाष्य केले आहे. रावसाहेब दानवे बोलत असताना “मुख्यमंत्री व्हा”, अशी मागणी सभागृहातून झाली. त्यावेळी दानवे म्हणाले कि, “सध्या मुख्यमंत्री आपलेच आहेत. यापूर्वी मराठवाड्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत.” तर सभागृहातून पुन्हा मागणी झाली कि,”‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री जालन्याचा हवा.” त्यावर उत्तर देताना दानवे म्हणाले कि,”पुढच्या काळात विचार करू”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर कोल्हापूरला मिळाले ‘हे’ नवे पालकमंत्री

News Desk

‘साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये’ छगन भुजबळांची निर्दोष मुक्तते नंतर पहिली प्रतिक्रिया

News Desk

बारामती तालुक्यातील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

Aprna