HW News Marathi
मुंबई

दिव्यांग सेनेचा विविध मागण्यासाठी मेट्रोच्या कार्यालयावर धडक मोर्चा

मुंबई | मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ न दिल्यामुळे दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षाजास्त दिव्यांग कार्यकर्त्यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक् येथील मुंबई मेट्रो रेलच्या कार्यालयात घुसले. आणि अधिकारीच्या खुर्चीवर दिव्यांग सेनाचे अध्यक्ष प्रसाद साळवी बरोबर सर्व दिव्यांगांनी कब्जा केला. हे कळताच मेट्रो रेलच्या अधिकारी विजया लक्ष्मी यांनी दिव्यांग सेनेबरोबर ताबडतोब चर्चा केली.

दिव्यांगांची ४ टक्के नोकरी, दिव्यांग स्टॉल, दिव्यांगांना मेट्रो तिकीतमध्ये सवलत, दिव्यांगांनसाठी वेगळी तिकीत खिडकी, कर्णबधिरांना मेट्रो मध्ये सांकेतिक भाषे मध्ये माहिती द्या, अशा दिव्यांगांच्या हितासाठी मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. या मागण्याजोपर्यंत पुर्ण होत नाही. तोपर्यंत दिव्यांग सेना या पेक्षाही मोठे आंदोलन करेल असा इशारा मेट्रो रेलच्या अधिकारी विजया लक्ष्मी यांना दिला.

या मोर्चात दिव्यांग सेना अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्यासोबत दिव्यांग सेनेचे सरचिटणीस रोहन सातार्डेकर, महाराष्ट्र सचिव नितीन गायकवाड, मुंबई अध्यक्ष मोहन गुरव आणि मुंबई सरचिटणीस शकिला शेख सहभागी झाले होती..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

Adil

दाऊदची पत्नी मुंबईत आली होती

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk