HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात एकाचं दिवसात १००८ रूग्ण ,एकट्या मुंबईत ७५१ रूग्ण

मुंबई | राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१ मे) दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्ग मधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे.

या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ७८१२ (२९५)

ठाणे: ५१ (२)

ठाणे मनपा: ४३८ (७)

नवी मुंबई मनपा: १९३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १७९ (३)

उल्हासनगर मनपा: ३

भिवंडी निजामपूर मनपा: १७ (१)

मीरा भाईंदर मनपा: १३५ (२)

पालघर: ४४ (१)

वसई विरार मनपा: १३५ (३)

रायगड: २६ (१)

पनवेल मनपा: ४८ (२)

ठाणे मंडळ एकूण: ९०८१ (३२०)

नाशिक: ६

नाशिक मनपा: ३५

मालेगाव मनपा: २०१ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८(२)

धुळे मनपा: १८ (१)

जळगाव: ३४ (११)

जळगाव मनपा: १० (१)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: ३६५ (३०)

पुणे:६८ (४)

पुणे मनपा: ११७६ (९२)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: १०१ (६)

सातारा: ३२ (२)

पुणे मंडळ एकूण: १४५६ (१०७)

कोल्हापूर: ९

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: २९

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: २ (१)

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५५ (३)

औरंगाबाद:२

औरंगाबाद मनपा: १५९ (८)

जालना: ३

हिंगोली: २२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ४

लातूर मंडळ एकूण: २० (२)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: २७

अमरावती: २

अमरावती मनपा: २६ (७)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १३३ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)

इतर राज्ये: २७ (३)

एकूण: ११,५०६ (४८५)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण!

News Desk

दिलासादायक ! परळी तालुका कोरोनामुक्त

News Desk

‘लॉकडाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच उत्तर जनतेला मिळावे!

News Desk