HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे?

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा १० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेला लॉकडाऊन ३ मेला संपणार आहे. त्या आधीच आज (१ मे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी राज्यात जे झोन तयार केले आहेत त्यानुसार लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता येईल असे सांगितले. केंद्र सरकारने जारी केलेल्या झोन्सची यादी पाहूयात.

रेड झोन – या झोनमधील कोणत्याही जिल्ह्यात इतक्यात निर्बंध हटवले जाणार नाहीत.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

ऑरेंज झोन – या भागातील निर्बंध काही अंशी शिथिल करण्यात येणार

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन – या भागात लॉकडाऊनचे नियम पुर्णपणे शिथिल करणार मात्र तरीही जास्त गर्दी करण्यास मनाई असणार आहे. आणि जर नियम मोडले तर पुन्हा निर्बंध लागू करणार.

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न

News Desk

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विधिमंडळातील ३६ जण कोरोनाबाधित

News Desk

भारतात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला होणार सुरुवात | पंतप्रधान

News Desk