HW News Marathi
महाराष्ट्र

घराला घरपण देणाऱ्या डिएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

पुणे | गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक डी.एस.के. व त्यांची पत्नी सध्या पुण्याच्या येरवडा तुरूंगात आहेत. परंतु सध्या डी.एस. के त्यांच्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चर्चेत आहेत. तरुंगात असलेल्या डी.एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी या दोघांच्या हातात गुन्ह्याची पाटी आहे व त्यावर कलमे लिहिली आहेत. या पाटीवर डी. एस. के यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची नोंद त्यांच्या नावासह करण्यात आली असून ती पाटी त्यांच्या हातात देण्यात आली आहे. तशीच पाटी नाव आणि गुन्ह्यांच्या नोंदीसह डी. एस. के यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या हातात देण्यात आली आहे.

बांधकाम व्यवसायिक दिपक कुलकर्णी यांचा ड्रीम सिटी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता पण तो पूर्ण होण्याच्या आधीच डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांनी डी. एस. के यांना कडाडून विरोध केला तर काही लोकांनी डी एसकेंना पाठिंबा दिला. पाठिंबा देणा-यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता. परंतु इतके होऊनही फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली. सध्या डीएसके व त्यांची पत्नी हेमंती पुण्यातील येरवडा तुरूंगात आहेत. बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची वाझेंची हालचाल CCTV त कैद

News Desk

जागतिक आरोग्य दिवस नर्सेस आणि डॉक्टर्स यांच्या कामगिरीला समर्पित

swarit

यंदाच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच – सामना

News Desk