HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात शिवसेना नेते दीपक मारटकरांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू

पुणे | शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपुत्र युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेते दीपक मारटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला काल (१ ऑक्टोबर) रात्री उशिरा करण्यात आला. ५ ते ६ हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी देखील झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

१२ वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेला नाही. हल्लेखोराचा शोध परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे, अशी माहिती फरासखाना पोलिसांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna

‘ही तर बाळासाहेबांची शिकवण!’

News Desk

शाहू महाराजांच्या आशीर्वादाने संभाजीराजेंनी फुंकलं रणशिंग ! महाराष्ट्र दौरा सुरू

News Desk