HW News Marathi
महाराष्ट्र

३-४ दिवसात मोठी बातमी देऊ , एकनाथ खडसेंचे मोठे वक्तव्य!

जळगाव |आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली आहे. भाजपच्या बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत.

पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून सहभागी झाले होते.

दरम्यान, या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले. या बैठकीमध्ये ऑडिओ क्लिप विषयी देखील विचारणा झाल्याची माहिती असून त्याविषयी मात्र खडसे यांनी बोलणे टाळले. तसेच क्लीप मधील संवादानंतर राष्ट्रीय स्तरावरील नेते खडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्जा राजाच्या साक्षीने नवदाम्पत्याने केली आपल्या सहजीवनाची सुरुवात

Aprna

आमच्या १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार ! चंद्रकांत पाटलांचा इशारा

News Desk

आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? राऊतांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक 

News Desk