HW News Marathi
Covid-19

पुणे उद्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ सुरू राहणार

पुणे । महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात उद्यापासून (२८ एप्रिल) अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकले असून त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.

पुण्यात काल (२६ एप्रिल) एका रात्री ५५ रुग्ण आढळून आले. पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर पोहोचली आहे. ससूनमधील तीन जणांचा व मंगेशकर रुग्णालयामध्ये दोन अशा पाच जणांना आज ( २७ एप्रिल) मृत्यू झाला आहे.

पुण्यात काल जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२६४ वर पोहोचली होती, ही संख्या आता १३१९वर पोहोचली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकाचा कॉन्टॅएक्ट ट्रेसिंगवर भर

News Desk

सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

News Desk

तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या ! संजय राऊतांनी भाजपला सुनावले

News Desk