HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

मुंबई | शिवसेनेने भाजपसोबत यावे असे मत रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेला काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा नाराजीनाट्य घडत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत यावे, अशी साद आठवलेंनी घातली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावे, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामे होत नसल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली.

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी एक तोडगा सुचवला आहे. ‘उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,’ असा पर्याय आठवलेंनी सुचवला. ‘भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनीदेखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘CBI’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk

Axis बँकेवर ठाकरे सरकारची कृपा, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

News Desk

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk