नवी दिल्ली | ‘चांद्रयान-२’ दिवसेंदिवस चंद्राच्या अधिकाधिक जवळ जात असून चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागाचे ४३७५ कि.मी उंचीवरून छायाचित्रे टिपलेले असून इस्त्रोने प्रसिद्ध केले ट्वीट करत प्रसिद्ध केले आहे. २३ ऑगस्टला टिपलेल्या या छायाचित्रात चंद्रावरील विविध विवरांचे दर्शन घडते.
#ISRO
Lunar surface imaged by Terrain Mapping Camera-2(TMC-2) of #Chandrayaan2 on August 23 at an altitude of about 4375 km showing craters such as Jackson, Mach, Korolev and Mitra (In the name of Prof. Sisir Kumar Mitra)For more images please visit https://t.co/ElNS4qIBvh pic.twitter.com/T31bFh102v
— ISRO (@isro) August 26, 2019
चांद्रयानाने टिपलेल्या ताज्या फोटोंमध्ये जॅक्सन, माच, मित्रा आणि कोरोलेव्ह ही विवरे दिसत आहेत. यातील मित्रा या विवराचे नाव प्राध्यापक शिशीरकुमार मित्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. जॅक्सन या विवराचा झूम करून काढलेला फोटोही प्रसिद्ध करण्यात आला असून या विवराचा व्यास ७१.३ किलोमीटर इतका असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चांद्रयानाने २१ ऑगस्ट रोजी सर्वप्रथम चंद्राचा फोटो टिपला होता. या फोटोत अपोलो विवर दर्शविण्यात आले होते. त्याआधी ४ ऑगस्ट रोजी चांद्रयानाने पृथ्वीचा मनमोहक फोटो पाठवला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.