HW News Marathi
Covid-19

बीड जिल्हयात हजारो मुक्या जनावराना नवीन आजाराची लागण

बीड | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रत कोरोनाचा रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. तर राज्यात दुसऱ्या बाजुला मुक्या जनावरांमध्ये नवीन आजाराची लागण लक्षणे आढळून आली आहे. बीडमध्ये कोरोनाच्या संकटात आणखी नवी भर पडली आहे. यामुळे राज्य सरकारच्या संकटात भर पडली आहे. बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील हजारो मुक्या जनावरांना नवीन आजाराची लागण झाली आहे. पशुतज्ञांचा अंदाजनुसार प्राण्यांमध्ये देवीच्या साथीच्या विषाणू लक्षणे आढळून आली आहेत. बीड जिल्हयातील हजारो मुक्या जनावरामध्ये देवीच्या साथीच्या आजाराची लागण दिसून आली आहे.

यामुळे बीड जिल्ह्यातील गाय,म्हैस, बैल,यांच्या अंगावर फोंड, घशाला तोंडाला सूज आणि ताप आल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई,परळी तालुक्यातील शेकडो गुरांना या आजाराची लागण झाली असून आतापर्यंत काही जणांचा मृत्यू झाला आहे. परळी तालुक्यातील पिंपळगाव शिवारात १० गावात या आजाराचा जास्त प्रमाणात प्रभाव आढळून आला आहे. हा आजार देवीच्या साथीचा विषाणू असल्याचा अंदाज पशुतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही इलाज सापडलेला नाही. या साथीच्या रोगामुळे लाख मोलाची जनावरं मरण्याच्या मार्गावर उभी आहे. उपचार मिळू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्या देखत जनावरांना तडफत पाहावे लागत आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण!

News Desk

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे! – छगन भुजबळ

Aprna

सौम्य लक्षण असलेल्यांकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता !

News Desk