नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासंदर्भात जी तयारी सुरू आहे त्या भूमिकेचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले आहे. लस विकत घेण्यासाठी तसेच वितरणासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली आहे का असा सवाल त्यांनी या आधी केंद्र सरकारला विचारला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीच त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.
We share and applaud your vision @narendramodi ji, on providing vaccines to the global community. It is a proud moment for India, thank you for your leadership and support. It is clear that all your arrangements for India will take care of all needs for the Indian people. https://t.co/b57TH8fDSB
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) September 27, 2020
लसीच्या जगभर वितरणाबाबत पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वक्तव्य केले होते. या उद्गारांबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अदर पुनावाला यांनी कौतुक केले आहे. भारतातील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी उपलब्ध होऊ शकतील, का असा परखड सवाल पुनावाला यांनी शनिवारी विचारला होता. मात्र मोदींचे भाषण ऐकून पुनावाला यांचे मत बदलले आहे.
Quick question; will the government of India have 80,000 crores available, over the next one year? Because that's what @MoHFW_INDIA needs, to buy and distribute the vaccine to everyone in India. This is the next concerning challenge we need to tackle. @PMOIndia
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) September 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.