पुणे | पुण्यात आज (२६ एप्रिल) नव्याने ७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ११३९ झाली आहे. तर ६ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज १० ते १२ या वेळेतच सुरु आहेत. हा कालावधी कमी असल्याने जास्त गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही. यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच ही वेळ आणखी दोन तास वाढविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
पुणे कोरोना अपडेट : रविवार, २६ एप्रिल, २०२०
पुणे शहरात आज नव्याने ७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या १ हजार १३९ झाली आहे. तर ६ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.#PuneFightsCorona pic.twitter.com/P7Mv0gzxgv
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.