HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात

जळगाव | भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गिरीश महाजन सुखरूप असून एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ ही घटना घडली. दरम्यान दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा–वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नव्हते. गिरीश महाजन यांनी स्वत: जखमी तरुणाला मदत केली. महाजन यांनी जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, लोहारा–वरखेडी हा रास्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे आमदार गिरीश महाजन यांचे वाहन हळू चालत होते. मात्र, रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो आमदार महाजन यांच्या वाहनावर मागच्या बाजूनं आदळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांची आघाडी

News Desk

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका – अजित पवार

News Desk