नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिस्कवरी चॅनलवर बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन वर्सेज वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रात मोदी बेअर ग्रिल्ससोबत अनेकदा हिंदीत संभाषण केले होते. मोदींनी केलेले हिंदीतील संभाषण ग्रिल्सला हिंदी कसे समजत असणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र, याचा खुलासा खुद्द मोदींनी काल (२५ ऑगस्ट) झालेल्या ‘मत की बात’ या कार्यक्रमातून केले.
PM Modi: A lot of people wanted to know how Bear Grylls understood my Hindi. People asked whether it was edited or shot multiple times. Technology acted as bridge between me & him. A cordless device attached to his ear translated Hindi into English simultaneously. pic.twitter.com/yE0iSwQOUW
— ANI (@ANI) August 25, 2019
मोदींनी या कार्यक्रमात सांगितले की, ‘मी ग्रिल्ससोबत अनेकदा हिंदीतून संवाद साधत असल्याने काही जणांना हे शॅाट्स एडिट करण्यात किंवा अनेकवेळा चित्रीत केल्याचे बोलले जात होते. परंतु असे काहीही झाले नसून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला होता. बेअर ग्रिल्सच्या कानात एक वायरलेस उपकरण लावण्यात आले होते. त्यामध्ये मी हिंदीत बोलत असलेले शब्द इंग्रजीत भाषांतरित केले जात होते. त्यामुळे बेअर ग्रिल्सला मी काय बोलतो,’ हे कळत असल्याचा खुलासा यावेळी मोदींनी केला.
मॅन वर्सेज वाईल्ड’ हा विशेष एपिसोड १२ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम देशातच नाही, तर जगभरात पाहिला गेला असल्याचे बेअर ग्रिल्सने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.