HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली | देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. देशमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी आज (२६ एप्रिल) सकाळी ११ वाजता रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशाला संबोधित करणार आहेत.

मोदी आज मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेला कोरोना व्हायरसबाबत माहिती देऊन त्यांच्या सहकार्याची स्तुती करू शकतात. तसेच कोरोना वॉरिअर्स म्हणजेच डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आवाहनही करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ‘मन की बात’ या कार्यक्रमा होणार असल्याची माहिती दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती

देशात कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ९४२ वर पोहोचली असून ७७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासात १ हजार ४९० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार २१० जण कोरोनामुक्त झाले आहे. देशात महाराष्ट्र कोरोनाचे सर्वाधित रुग्णांची संख्य आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकरांनी भरवला फडणवीसांना पेढा,पंढरपूरच्या विजयाचं मुंबईत सेलिब्रेशन !

News Desk

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk

लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय – राजेश टोपे  

News Desk