HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आले आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करणार आहे.

 

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज (२६ सप्टेंबर) दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे. तसंच काल (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणि आजच्या दीपिकाच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

आता आधार कार्डसाठी जीएसटी

News Desk

विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

Aprna