HW News Marathi
महाराष्ट्र

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द

नागपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण उत्सव या वर्षी साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. अशातच मोठ्या उत्साहात साजरा होणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे. नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीने सांगितले आहे.

धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी १४ ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात. १४ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचीव सुधीर फुलझेले यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण आमच्या आयुष्यात खास आहात, संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांना खास शुभेच्छा!

News Desk

MPSC परीक्षेतून होणारं संघीकरण आणि भाजपचा प्रचार रोखा,यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र दौरा

News Desk