HW News Marathi
महाराष्ट्र

अबू सालेमची पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारली

नवीमुंबई | डॉन अबू सालेमला लग्नासाठी ४५ दिवसांची पॅरोल मिळावी म्हणून त्याने अर्ज केला होता. परतुं नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा अर्ज फेटाळला आहे. मुंब्रा येथे रहाणा-या कौसर नावाच्या तरुणी सोबत माझे लग्न झाले नव्हते. ती मला फक्त भेटण्यासाठी आली होती. परंतु प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तामुळे तिचे माझ्याशी नाव जोडले गेले. या वृत्तामुळे तीची सर्वत्र बदनामी झाली. त्यामुळे मला आता तिच्याशी विवाह करावाच लागेल. त्यासाठी सुट्टी हवी आहे अशा आशयाचे पत्र आबू सालेमने गृहविभाग आणि तळोजा जेल प्रशासनाला दिले होते.

परंतु प्रशासनाने सालेमच्या पॅरोलला स्पष्ट नकार दिला आहे. सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झाले अशी बातमी फोटोसह एका वृत्तपत्रात गतवर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या फोटोत कौसर अबू सालेमसोबत ट्रेनमध्ये होती. टाडा न्यायालयाने सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात असून खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. सध्या अबू सालेम नवी मुंबईतील तळोजाच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हायकोर्टात बुधवारी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी

News Desk

आज बाळासाहेब असते, तर… क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री ठाकरेंना भावनिक पत्र

News Desk

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

News Desk