HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारने प्लाझ्मा बॅगच्या किंमती केल्या निश्चित!

मुंबई | राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगच्या किंमती निश्चित केली आहे. या प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून ५५०० इतका कमाल दर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा, संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रतिचाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे. राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पध्दती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन आणि सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना तत्काळ मुदतवाढ द्यावी, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

News Desk

कोरोनाचा उद्रेक! भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद

News Desk

केंद्राच्या अनलॉक-५च्या गाईडलाईन्स जारी, चित्रपटगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी!

News Desk