HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वेक्षण सुरु – मुरलीधर मोहोळ

पुणे | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५६४९ वर पोहोचला आहे. पुण्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ७७२ वर गेला आहे. काल (२२ एप्रिल) पुण्यात एकूण ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ५० वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला. त्यामूळे पुण्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर गेली आहे. तर काल ३५ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण पुण्यातील कोरोनामुक्तांची संख्या ही १२२ झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वेक्षण केले जात आहे. या माध्यमातून सुरु असलेल्या सर्वेक्षणातून आत्तापर्यंत ४० लाख ६३ हजार ७८४ पुणेकरांची माहिती संकलित झाली आहे. ७५४ टिम्सच्या माध्यमातून १२ लाख ३४ हजार ४७० घरापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

News Desk

मोदींच्या ‘या’ निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले, आठवलेंचा टोला

News Desk

परळीत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित, आवश्यकतेच्या ४०% ऑक्सिजन रुग्णालयातच होणार निर्माण

News Desk