HW News Marathi
देश / विदेश

“माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो” | दीपिका सिंह

नवी दिल्ली | कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित मुलीच्या बाजूने लढत असलेल्या वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला कठुआ बलात्कार प्रकरणामुळे धोका निर्माण झाला आहे.दीपिका यांनी ‘माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो’, असे म्हटले आहे.

असिफाला न्याय मिळावा यासाठी मी लढाई लढत आहे. मात्र हा खटला घेतल्यापासून मला सर्वांनी वाळीत टाकले आहे. माझ्यावर अप्रत्यक्षपणे बहिष्कारच घालण्यात आला आहे. त्यामुळे या लढाईत मी किती दिवस टिकेन हे मला माहीत नाही,’ अशी हतबलता दीपिका सिंह यांनी व्यक्त केली आहे.

‘माझ्यासोबत काहीही होऊ शकते. माझ्यावरही बलात्कार होऊ शकतो. माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी कोर्टातील प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकते. सध्या मी अत्यंत भयंकर परिस्थितीतून जात आहे. मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचेही त्यानी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत कोरोनाधितांच्या आकड्यात ‘कृत्रिम’ घट, फडणवीसांचा आरोप

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk

“असे येडे बरळतच असतात”, राऊतांचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला  

News Desk