मुंबई | भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड बंद केल्यानंतर पैसे कुठून काढायेच असा प्रश्न उभा राहतो. कारण एसबीआयचे बहुतांश ग्राहक हे डेबिट कार्डवर अवलंबून आहे.
देशभरात सध्या सुमारे ९० कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी ‘योनो’ प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल. एसबीआय डिजिटल प्रणाली आणण्यासाठी प्रयत्नशील असून डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसबीआयने ‘योनो’ प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. योनोमुळे देश कार्ड मुक्तीकडे वाटचाल करेल. त्यामुळे डेबिट कार्ड ऐवजी योनोद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.
“बँकेकडून आधीच ६८ हजार ‘योनो’ कॅशपॉईंट्स बसविण्यात आले असून येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा दहा लाख करण्याची योजना आहे. येत्या पाच वर्षात प्लास्टिक कार्डचा वापर मर्यादित होईल. तसेच येत्या काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा ‘स्टॅण्ड बाय’चा पर्याय म्हणूनच राहिल,” असे बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.