पटना | बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या डीजीपी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि ती मंजूरही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार बनू शकतात असे वृत्त आहे. गुप्तेश्वर पांडे यांचा राजीनामा स्वीकारला असून संजीव कुमार सिंगल यांच्याकडे कार्यभार सोपवला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
Sanjiv Kumar Singhal (in file pic), DG Civil Defence and Fire Services given the additional charge of DGP Bihar till further orders. https://t.co/c8LJbZ0gDt pic.twitter.com/20NZBy3HvZ
— ANI (@ANI) September 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.