HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसभा खासदार फौजिया खानही अन्नत्याग करणार, शरद पवारां पाठोपाठ घेतला निर्णय

परभणी | लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले कृषी विधेयक आणि त्या विरोधात संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला आता सगळीकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण देखील आंदोलकांसोबत एक दिवस अन्नत्याग करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील अन्नत्याग करत या आंदोलनात सहभागी होत असल्याचे ‘सरकारनामा‘शी बोलतांना सांगितले आहे.

कृषी विधेयकला विरोध करत राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस सोबत अन्य पक्षाच्या ८ खासदारांना उपसभापतीने ७ दिवसांसाठी निलंबित केले होते. या कारवाई आणि कृषी विधेयकांच्या विरोधात या सर्व खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळच उपोषण सुरू केले. त्याचे पडसाद आजही संसदेत उमटले आणि खासदारांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला सुरूवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज(२२ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपोषणाला बसलेल्या खासदारांना पाठिंबा दर्शवत शरद पवार यांनी देखील आपण एक दिवस अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

News Desk

केंद्र सरकार महाराष्ट्राला दाबाण्याचा प्रयत्न करत आहे, रेल्वे सुरु करण्यावरुन आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया!

News Desk

भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला !

swarit