मुंबई | वाधवान कुटुंबीयाचा क्वॉरंटाइन पिरियड आज (२२ एप्रिल) दुपारी २ वाजता संपणार आहे. ईडी आणि सीबीआयला आम्ही कालच (२१ एप्रिल) पत्र लिहून त्याबाबतची कल्पना दिली आहे. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली आहे. यावेळी देशमुख यांनी पालघर मॉब लिंचिंग आणि वाधवान कुटुंबासंदर्भात माहिती दिली.
Today Wadhawan family is completing their quarantine period. So police has informed ED & CBI that they should come & take them in custody. We've requested them to take custody after 2 pm today. But if they don't, they will be in our custody till ED/CBI comes: Maharashtra Home Min pic.twitter.com/fV5V80SvJ8
— ANI (@ANI) April 22, 2020
तसेच मधल्या काळात काही जण लंडनला पळाले, पण आम्ही वाधवान कुटुंबाला कुठेही पळू देणार नाही, असे म्हणत देशमुखांनी भाजपला टोला लगावला आहे. बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला सट्टीसाठी गेले होते. महत्त्वाचे म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचे पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकार उघडकीस आल्यानंतर विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ताला देशमुखांनी सक्कतीच्या रज्जेवर पाठवले होते.
#CBI व @dir_ed यांना सूचीत करण्यात आले आहे की वाधवान परिवारातील २३ जणांचं संस्थात्मक अलगीकरण आज १३.४७ वा. संपुष्टात येत आहे व त्यांनी या सर्वांचा ताबा घ्यावा. pic.twitter.com/OYqSMQJpmv
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतले नव्हते. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता. या क्वॉरन्टाईचा वेळा आज संपत आहे.
वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल
वाधवान कुटुंबाने लॉकडाऊनचे सर्व नियम मोडत प्रवास केला होता. दरम्यान, त्यांना या प्रवासाची परवानगी गृह मंत्रालयातील विशेष सचिव अमिताभ गुप्ता याांनी दिली होती. याच वाधवान कुटुंबीतील कपिल वाधवान आणि २२ जणांवर साताऱ्यातील महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कलम १८८, २९६, २७०, ३४ यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.