मुंबई | मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात न्यायालयात नेमकी काय सुनावणी होणार याकडे सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती हटवण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्यासाठीचा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे देण्यात आला आहे.
Maharashtra government files a petition in Supreme Court, seeking vacation of its stay order on Maratha reservation. pic.twitter.com/sqpgWVp2Gp
— ANI (@ANI) September 21, 2020
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणांहून या स्थगितीविरुद्ध आंदोलने करण्यात आली. लवकर राज्य सरकारने पावले उचलावी यासाठी वारंवार विनंतीही करण्यात आली. तसेच, आज मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चर्चा देखील झाल्याची माहिती अशोक चव्हाणांनी माध्यमाशी बोलताना दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.